Aloe Health Care

मी Aloe health care कंपनी Managing director अजीज नदीम शेख.. माझे गाव अकलूज (माळीनगर), माझे प्राथमिक शिक्षण मॉडेल हायकूल माळीनगर येथे झाले. आणि उच्चशिक्षण शंकरराव मोहिते पाटील माळेवाडी अकलूज येथे पूर्ण झाले. मला आधीपासूनच शेतीची खूप आवड असायची. मला शेती काहीच नव्हती तरी पण मला शेतीची खूप आवड होती म्हणून शिक्षण घेत असताना मी 2003 साली Crop science हा विषय निवडला. तिथेच मला या 5 विषयावर भरपुर काही शिकायला भेटले.
1)Elements of Agricultural
2)Food Crop
3)Cash Crop
4)Plantation Crop
5)Fram Management & Agro Forestry
भरपुर शिक्षण घेत असताना भरपूर काही शिकायला भेटले. मला शेती काहीच नव्हती तरी पण मला शेतीची खूप आवड होती, मी शिक्षण घेत असताना शिकलेले वाया जाऊ देणार नाही हा पन केला आणि शेती विषयाची मला जी काही माहिती होती ती मी लोकांना सांगायचो तेव्हा मला खूप छान वाटायचे, एवढेच नाही तर पुण्यनगरी पेपरात मी शेतीविषयक लेख पाठवायचो आणि त्यातील बरेच लेख प्रसिद्ध झाले तेव्हा खूप अभिमान वाटायचा की माझा लेख पुण्यनगरी पेपरमध्ये प्रसिद्ध झाला म्हणून. राज्यातील विशेषत: नंदुरबार जिल्ह्यातील खूप लोकांनी पेपरात छापून आलेला लेख मला खूप आवडला म्हणून सांगायचे त्यातील काहींना शेतीविषयक अडचणी असायच्या लेख वाचल्यानंतर त्यांना मार्गदर्शन मिळायचे.
माझी घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मला कुठेतरी नोकरी मिळावी अशी घरातून अपेक्षा होती, सुमारे दोन वर्ष सरकारी नोकरीसाठी खूप प्रयत्न केले पण यात काही यश मिळाले नाही. कालांतराने २००६ साली पुण्यातील एक नामांकित आयुर्वेदिक कंपनीत भरतीची जाहिरात पेपरात पाहिली, Omkar Herbal या कंपनीचे मालक श्री. राजेश होळकर यांनी मला आयुर्वेदाचे महत्व पटवून सांगत औषध विक्री करणे हा जॉब दिला. मलाही प्रथमच जॉब भेटला म्हणून ते काम मी मनापासून करू लागलो, यावेळी कोरफड ज्यूस व आमला ज्यूस व कोरफड जेल तुळशी ड्रॉप हे प्रोडक्टस घेऊन मी मार्केटिंग करू लागलो. बऱ्याच लोकांना जाऊन कोरफडीचे महत्व त्याचे शरीरावर होणारे परिणाम याबद्दल सांगू लागलो. कोरफड ही बहुगुणी वनस्पती असल्याने लोकांना फायदा होत असल्याने लोकांचे फोन येऊ लागले तेव्हा मलाही खूप छान वाटू लागले. आपण जे काम करतोय ते लोकांच्या गरजेचे आहे लोकांना आवडतेय असे वाटू लागले. यानंतर मी विचार केला कि खरच या कोरफड ज्यूस व तुळशी ड्रॉपने जर लोकांना फरक पडत असेल तर हे काम मी पैसे कमवणे नाही तर लोकांची गरज आहे व बेरोजगाराना रोजगार उपलब्ध होतोय असे समजून करू लागलो.
त्यानंतर मला डायरेक्ट कंपनीने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्याचे डिस्ट्रिब्युटर दिले त्यामुळे मला माझी agency काढणे गरजेचे वाटले. Agency म्हटले कि नाव आलेच मग कोरफड अर्थात AloeVera हि बहुगुणी वनस्पती मग यातील aloe हे नाव घेत health care असे नाव संबोधित केले. मला आता तीन राज्यात प्रचार करायचा होता त्यासाठी मी सुशिक्षित बेरोजगार मुले मुली आणि महिलांना नोकरी उपलब्ध करून देऊ शकलो. यामुळे कमीतकमी १०० लोकांना मी रोजगार देऊ शकलो यापुढेही देत राहणार.
मी या कामातून एकच ठरवले आहे कि चांगले प्रोडक्टस चांगल्या लोकांमार्फत चांगल्या लोकांपर्यंत पोहचवणे अशी जबाबदारी मी पूर्ण करतो आहे. आज वर्ष २०२१-२०२२ अखेर Aloe Health Care India या कंपनीत १०० पेक्षा जास्त स्टाफ आनंदाने काम करतो आहे आणि १५,००० ते २०,००० पगार मिळवतो आहे.
अजीज नदीम शेख. माळीनगर, ता – माळशिरस, जि – सोलापूर.